निवडणूक भरारी पथकाची कारवाईअडिच कोटींची रोकड जप्त

PCB Admin
1 Min Read

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. अशाच एका भरारी पथकाने मुंबईच्या देवनार परिसरातून 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. त्यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. ही रक्कम कशासाठी आणि कुठून आली याबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत.

निवडणूक भरारी पथकाने मुंबईच्या देवनार परिसरातून 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. ही रोकड ATM मध्ये भरण्यासाठी नेली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या रकमेबाबत संशय असल्यामुळे या पैशांची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून पुढील तपास आयकर विभागाकजे सोपवण्यात आला आहे. सध्या ही रोकड देवनार पोलिसांकडे कस्टडी म्हणून ठेवण्यात आली असून ही रोकड कुठून कुठे नेली जात होती याची माहिती घेतली जात आहे.

Share This Article