मनसे शिवसेना एकत्र आनंद उत्सव साजरा……

0
8

मुंबई , दि. ३ ( पीसीबी )महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (उबाठा) सांगवी, नवी सांगवी,पिंपळे गुरव एकत्र येऊन फटाकड्याची आतिषबाजी तसेच मिठाई वाटप करून जल्लोषात आनंद साजरा केला यावेळी पदाधिकारी मनसे सैनिक व शिवसैनिक उपस्थित होते…..

मा.राजसाहेब ठाकरे आणि मा.उद्धवसाहेब ठाकरे एकत्र येऊन हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी भाषा अस्मितेसाठी विराट मोर्चा काढणार नुसत्या घोषणेने भाजप सरकारची पायाखालची वाळू सरकली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा काढलेला जीआर मागे घेण्यास भाग पडले.

मराठी मातांनो,भगिनिंनो आणि बांधवानो याचा आनंद जल्लोष साजरा करण्यासाठी सांगवी, नवी सांगवी,पिंपळे गुरव सर्व पदाधिकारी मनसे सैनिक व शिवसैनिक मुंबईला एकत्र निघणार आहेत याची घोषणा केली तरी आपणही या आनंद उत्सवात सहभागी होऊन यांचे साक्षीदार व्हा