मन सुन्न करणारी घटना! षटकार मारताच जमिनीवर कोसळला फलंदाज, मैदानावरच सोडले प्राण

0
12

दि. २९ ( पीसीबी )पंजाब : क्रिकेटच्या मैदानावर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झल्याची घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. आता पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील गुरुहरसहाय विधानसभा क्षेत्रात अशीच एक घटना घडली आहे. ज्याने सर्वांना हादरवून सोडले आहे.
डीएव्ही शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळताना हरजीत सिंग नावाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मैदानावरच मृत्यू झाला. हरजीत आपले अर्धशतक पूर्ण करत असताना ही घटना घडली. सोशल मीडियावर सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या घटनेची पुष्टी करत असताना समोर आले की, हरजीत सिंग सकाळी क्रिकेट सामन्यात फलंदाजी करत होता हरजीतने एक शानदार षटकार मारत प्रेक्षकांचे लक्ष वेधले. षटकार मारल्यानंतर हरजीत मैदानावर बसला मैदानावर उपस्थित खेळाडूंना वाटले की, हरजीत थकला असेल पण दुसऱ्या क्षणाला हरजीत जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला. उपस्थित खेळाडूंनी त्याला सीपीआर दिला मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही, त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत असून, मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.