‘तुझे ५५ तुकडे करुन निळ्या ड्रममध्ये भरेन…” बायकोची नवऱ्याला धमकी; PUBGच व्यसन, बॉयफ्रेंडसोबत बायको पसार

0
7

उत्तरप्रदेश दि . २८ ( पीसीबी ) –उत्तरप्रदेशातील भटीपुरा (जि. महोबा) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल गेमच्या नशेत एका विवाहितेने आपल्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली असून, पोटच्या मुलालाही न जुमानता ती आपल्या प्रियकरासोबत निघून गेली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.३० वर्षीय शीलू रैकवार याचा विवाह आराधना या युवतीसोबत २०२२ मध्ये मटौंध, जि. बांदा येथे पार पडला होता. विवाहानंतर काही महिन्यांतच आराधनाला PUBG गेमचे प्रचंड व्यसन लागले. शीलू दुकानात असताना ती दिवसभर मोबाईलवर गेम खेळत बसायची. याच दरम्यान तिची ओळख लुधियाना (पंजाब) येथील शिवम नावाच्या युवकाशी झाली. हे नाते इतके पुढे गेले की दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले.शीलूच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीने त्याच्याशी वागण्यात अंतर ठेवायला सुरुवात केली. घरात सतत वाद व्हायला लागले. तिने पतीवर खोटे आरोप करत घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. इतकंच नाही तर, “तू जर माझ्या रस्त्यात आलास तर मी तुला ५५ तुकड्यांत कापून ड्रममध्ये टाकीन,” अशी भयाण धमकीही दिली, असे शीलूने पोलिसांना सांगितले.या सगळ्या वादात मुलालाही मारहाण करण्यात आली होती. यामुळे शीलू सतत मानसिक तणावाखाली जगत होता. काही दिवसांपूर्वी प्रियकर शिवम ९०० किलोमीटरचा प्रवास करून थेट महोबामध्ये शीलूच्या घरी येऊन पोहोचला आणि मोठा गोंधळ घातला.यानंतर अखेर त्रस्त झालेल्या शीलूने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शिवमला शांतता भंग केल्याप्रकरणी चलान केला. मात्र, आराधना हिने आपला पती व मुलगा दोघांनाही सोडून देत शिवमसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

शीलूने आपल्या आणि मुलाच्या सुरक्षेसाठी आराधनाला तिच्या प्रियकरासोबत जाऊ दिलं. सध्या शीलू आपल्या मुलासोबत वेगळं राहतो आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

मोबाईल गेमच्या नशेत पत्नीने घेतलेल्या या विकृत निर्णयामुळे संपूर्ण परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हे प्रकरण डिजिटल व्यसन आणि सामाजिक मूल्यांच्या ऱ्हासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.