आव्हानांशी सामना करत मार्गक्रमण करा – रेन्या किकुची

0
7

एस‌. बी. पाटील स्कूल मध्ये जपानी संस्कृती विषयावर संवाद

पिंपरी, पुणे (दि.२३ जून २०२५) जपान मधील भौगिलिक परिस्थितीमुळे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. भूकंप, अतिवृष्टी या नैसर्गिक आव्हानांचा सामना करत नैसर्गिक आव्हानांचा सामना करत उच्च तंत्रज्ञान आणि मानवी जीवन अधिक सुंदर करण्यासाठी जपानचा प्रत्येक नागरिक योगदान देत आहे. नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीपुढे खचून न जाता पूर्ण धैर्याने जपानी नागरिक मार्ग काढतो. येथील संस्कृती, उच्च विकसित तंत्रज्ञान यावर आधारित पायाभूत सेवा, सुविधांचा अभ्यास युवा पिढीने करावा यासाठी पीसीईटी संचालित एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपानला भेट द्यावी, असे मार्गदर्शन जपान येथील एससीसीआयपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेन्या किकुची यांनी केले.
जपानी संस्कृती विषयावर संवाद, संस्कृतींची देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय सहयोगाचा एक भाग म्हणून किकुची यांनी एस.बी. पाटील पब्लिक स्कूल, रावेत येथे नुकतीच भेट दिली. यावेळी एलएससीएल रोबोटिक्सचे संचालक डेव्हिड प्रकाश, प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापक शुभांगी कुलकर्णी, प्रशासन व्यवस्थापक मनीष ढेकळे व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी इयत्ता सातवी, आठवीच्या विद्यार्थ्यांनी जापानी भाषेत पाहुण्यांचे स्वागत केले. बालगीत सादर केले. विद्यार्थ्यांनी जपानी तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण कल्पना, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच शहर नियोजन आर्थिक स्थिरता, निवास वास्तुकला आणि दैनंदिन जीवनाविषयी रेन्‍या किकुची व डेविड प्रकाश यांना अनेक प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली.
तसेच शाळेची भविष्यातील वाटचाल, दृष्टिकोन, शिक्षण पद्धती आणि बहुभाषिक व बहुसांस्कृतिक शिक्षण याबाबत मान्यवरांनी मुख्याध्यापकांशी संवाद साधला.
स्वागत प्राचार्या डॉ. बिंदू सैनी आणि आभार मनीष ढेकळे यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.