केदारनाथ दरीत हेलिकॉप्टर कोसळले, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दि . १५ ( पीसीबी ) – उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात रविवारी (15 जून) सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळलं. हे हेलिकॉप्टर केदारनाथ धाम येथून यात्रेकरूंना गुप्तकाशी तळावर परत आणत होते. या हेलिकॉप्टरमध्ये 6 प्रौढ व्यक्ती आणि एक बाळ होते.
खोऱ्यातील हवामान अचानक बिघडल्यानं हेलिकॉप्टर अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

उत्तराखंडचे जिल्हा पर्यटन विकास अधिकारी आणि नोडल हेलिकॉप्टर सर्व्हिस राहुल चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज (15 जून) सकाळी आम्हाला एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच आम्ही त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

“प्राथमिक माहितीनुसार, आर्यन एव्हिएशनचे एक हेलिकॉप्टर केदारनाथ धाम येथून प्रवाशांना त्यांच्या गुप्तकाशी तळावर परत आणत होते. त्यावेळी खोऱ्यातील हवामान अचानक बिघडले. पायलटने हेलिकॉप्टरला खोऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण यादरम्यान हेलिकॉप्टर कोसळले.”

Share This Article