पत्रकार नेताजी मानकर यांचे निधन

PCB Admin
1 Min Read

ज्येष्ठ पत्रकार नेताजी दशरथ मानकर (वय ६७) यांचे आज दुपारी बिर्ला हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
दैनिक प्रभात मधे अनेक वर्षे बातमीदार म्हणून त्यांनी सेवा केली. निवृत्ती नंतर संस्कृती नामक साप्ताहिक त्यांनी सुरू केले होते.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. विविध सामाजिक कार्यात मानकर यांचा पुढाकार असे.
अंत्यविधी कस्पटे वस्ती वाकड येथील स्मशानभूमीत दुपारी साडेचार वाजता करण्यात येणार असल्याचे नातेवाईकानी सांगितले.

Share This Article