दि . ७ ( पीसीबी ) – ६ जून छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा . असा सोहळा जो डोळ्यांचं पारणं फेडतो . महाराष्ट्रातील प्रत्येक माणसामध्ये जोश आणि महाराजांप्रतीचं प्रेम आणि आपला राजा सिहांसनावर बसला ह्याचा अभिमान असतो . आज इतक्या वर्षानंतर सुद्धा राजांचा ईतिहास आणि त्यांनी स्वराज्य उभं करण्यासाठी सांडलेले रक्त ह्याचा विसर नाही पडला आणि हे राज्याभिषेका दिवशी रायगडावर जाऊन समजत . ६ जून म्हंटल की आपोआप मनात उभा राहतो तो रायगड आणि तेथे असलेली आपल्या आजच्या मावळ्यांची गर्दी . अश्याच पद्धतीनी विशाल रावळकर ( रा . थेरगाव, चिंचवड ) ह्यांनी आपल्या मित्रांसोबत ६ जून निमित्त रायगडावर राज्याभिषेकासाठी हजेरी लावली . ३० तरुणांना सोबत घेऊन प्रवासाचा आनंद तर घेतलाच पण आपला रायगड त्याची भव्यता आणि सोबतच राज्यभिषेकानिमित्त गडावर असलेल्या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेतला . सोहळा उत्सहात पार पडला . आणि ह्याच्या आठवणी त्यांनी सोबत घेऊन आपला प्रवास पूर्ण केला .