विकृत व्यक्तीने श्वानावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

2 Min Read

पुणे, दि. १२ : लैंगिक विकृतीने कळस गाठला असून ‘पिसाट’ कधी काय करतील याचा नेम राहिलेला नाही. ‘कामातुरानां न भयं न लज्जा’ अशी म्हण प्रचलित आहे. त्याचाच प्रत्यय आला हडपसरमधील एका घटनेने आला असून या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. एका विकृत व्यक्तीने श्वानावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आयहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हलीमुद्दीन शेख (रा. हांडेवाडी, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे. तो सध्या हडपसरमधील हांडेवाडी परिसरात राहण्यास आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुत्री पाळीव आहे. तिचा मालक कामानिमित्त घराबाहेर गेलेला होता. त्यावेळी आरोपीने कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केले. कुत्रीचा मालक घरी आल्यानंतर तिच्या वागणुकीमध्ये त्यांना अचानक बदल जाणवू लागले. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी घरामधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी हा घृणास्पद प्रकार प्रकार समोर आला. या प्रकारामुळे संतापाची लाट पसरली आहे.

कुत्रीच्या मालकाने या घटनेची माहिती शिवसेनेचे पदाधिकारी राजेश पळसकर यांच्यासह स्थानिक नागरिकांना दिली. पळसकर आणि नागरिकांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ हालचाल करीत आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

मानसिक विकृतीची अनेक उदाहरणे अनेकदा समोर येत असतात. यातील काही उदाहरणे म्हणजे अगदी किळसवाणी आणि संताप निर्माण करणारी असतात. अशीच एक घटना पुण्याच्या पश्चिम भागात घडली होती. एका विकृताने गायीवर बलात्कार केल्याची ही घटना होती. गोठा मालकानेच हा प्रकार पाहिल्यानंतर आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. विकास अवध शर्मा (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली होती.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी नारायण पेठेमध्ये अशीच एक घटना घडली होती. एका व्यक्तीने भटक्या श्वानाला पकडून आणत खोलीत त्याच्यावर बलात्कार केला होता. त्याने अनेकदा हे प्रकार केले होते. मात्र, एका सजग तरुणाच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार उघड झाला होता. या आरोपीला विश्रामबाग पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

Share This Article