महसूल विभागातील धडाकेबाज अधिकारी अन् अपर जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांचे निधन

1 Min Read

पीएमआरडीच्या अपर जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात्य बहीण आणि आई असा परिवार आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या स्नेहल बर्गे यांनी हवेली तालुक्याच्या प्रांतधिकारी म्हणून देखील काम पाहिले होते.

ती त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती. अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक यावर त्यांनी कठोर कारवाई केली होती. स्नेहल यांच्या बहीण पल्लवी बर्गे या देखील पोलिस अधिक्षक पदी कार्यरत आहेत.

स्नेहल बर्गे या प्रांतधिकारी म्हणून कार्यरत असताना बड्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण गाजले होते. स्नेहल यांनी त्यावेळी या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

 

 

Share This Article