शासकीय कर्मचार्‍यांना घर देण्‍याच्‍या नावाखाली फसवणूक

0
9

वाकड, दि. 18 (पीसीबी)
शासकीय व बँक सेक्‍टरमध्‍ये काम करणार्‍यांना कर्मचार्‍यांंसाठी बांधकाम साइट विकसित करीत असल्‍याचे सांगत चार लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना वाकड येथे उघडकीस आली.

याबाबत कस्‍पटेवस्‍ती, वाकड येथे राहणार्‍या ३९ वर्षीय व्‍यक्‍तीने हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमर कांतीलाल भुमकर (वय ४१, रा. भूमकर चौक, वाकड) आणि गौरव सचदेवा (पत्‍ता माहिती नाही) या दोघांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना २०१९ ते जून २०२४ या कालावधीत मुंबई बँगलोर महार्माच्‍या बाजूला, फोक्‍सवॅगर शोरूमच्‍या बाजूला, वाकड येथे घडली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून www.kendriysadan.org या ऑनलाइन वेबसाइटवर केंद्रीय कर्मचारी व बँक सेक्‍टरमध्‍ये काम करणार्‍यांसाठी वाकड परिसरात बांधकाम साइट विकसित करीत असल्‍याची जाहिरात केली. मात्र कोणतीही साइट विकसित न करता फिर्यादी यांची दोन लाख ५५ हजार व त्‍यांच्‍या ओळखीच्‍या महिलेची दोन लाख रुपये असे एकूण चार लाख ५५ हजारांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.