मी भाजपची राजकीय ‘आयटम गर्ल’-आझम खान

0
591

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – माझ्या नावावर मागील विधानसभा निवडणूक लढवली  होती. आताही पुन्हा माझ्याच नावावर आगामी लोकसभा निवडणूक लढवली जाईल. कारण की मी भाजपची राजकीय ‘आयटम गर्ल’ आहे, असे मिश्किल टिप्पणी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आझम खान यांनी केली आहे.

एका बैठकीसाठी आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  यावेळी ते म्हणाले की, माझी आता अशी अवस्था झाली आहे की, मलाच माहीत नाही माझ्यावर किती गुन्हे दाखल झाले आहेत. माझ्या नावाने किती समन्स आणि वॉरंट निघाले आहेत, याची माहितीच नाही. मी तर केवळ या खटल्यांसाठीच फिरत असतो.

माझ्या नावावर  कोणतीही संपत्ती नाही. माझे एकच बँक खाते विधान भवन येथील स्टेट बँकेच्या शाखेत आहे. याशिवाय देशात कोठेही माझे बँकेत खाते दिसून आले. तर मला कुतुबमिनारवर फाशी देण्यात यावी, असे ते म्हणाले. देशविघातक शक्तींचा पराभव करण्यासाठी दलित, मागास आणि असंघटितांना एकत्र यावे लागेल. तेव्हाच इन्कलाब होईल, असे ते म्हणाले. राममंदिरबाबत बोलताना आझम खान म्हणाले की,  सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य असेल.