तळेगावात एक लाख रुपयांचा दारुसाठा नष्ट

1 Min Read

तळेगाव, दि. 25 (पीसीबी) : हातभट्टी लावून तयार करण्यात येणारा दारुचा साठा तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई गुरूवारी (दि. 24) रात्री साडे नऊ वाजत आंबी गावच्या हद्दीमध्ये करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस अमंलदार धनंजय लक्ष्मण भोसले यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महिलेने आंबी गावामध्ये ओढ्याच्या कडेला दारु तयार करण्यासाठी हातभट्टी लावली होती. त्यामधील 1 लाख 2 हजार रुपये किंमतीचे दोन हजार लीटर कच्चे रसायन सापडले. पोलिसांनी ते नष्ट केले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article