घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

bpcauthor bpcauthor
1 Min Read

भोसरी, दि. 22 (पीसीबी) : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 18 ऑक्टोबर रोजी सकाळी महात्मा फुले नगर झोपडपट्टी एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आली.

याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने त्यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी 17 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता घरासमोर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article