शेलगाव (करमाळा)येथे स्व. महादेव पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मृतिस्थळाचे अनावर
करमाळा : दिवंगत सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस पाटील महादेव भगवान पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शेलगाव (क), ता. करमाळा येथे स्मृतिस्थळाचे अनावरण करण्यात आले. शेलगाव–गुरसुळी रस्त्यावरील पाटील फार्म येथे शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) पाटील परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंत परिवाराचे प्रमुख विलास घुमरे, ग्लोबल इंस्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. रविकिरण पवार, मुळशी तालुका तालुक्याचे माजी सभापती अण्णा खानेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सकाळी भजन व अभंग सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्व. महादेव भगवान पाटील यांच्या स्मृतिस्थळाचे अनावरण करण्यात आले. जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमात डॉ. गणेश शिंदे यांचे प्रवचन व व्याख्यान झाले. नाती जपा, माणसे जपा असा संदेश त्यांनी दिला.
घुमरे सर यांनी पाटील कुटुंबाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
विलास पाटील यांनी पाहुण्याचे स्वागत आणि प्रस्तावित केले.
याच कार्यक्रमात २४ भाऊ आणि २३ बहिणी यांचा भाऊबीज सोहळा पार पडला.
उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे आयोजन समस्त पाटील परिवार, शेलगाव (क) यांनी केले.

