पुण्यात ईडीची मोठी कारवाई; मंगलदास बांदल यांची 85 कोटींची मालमत्ता जप्त

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पुणे, दि. 17 (पीसीबी) : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांची 85 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे आता मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मंगलदास बांदल यांची पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

बेकायदा आर्थिक व्यवहार प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने 21 ऑगस्ट रोजी छापे टाकले होते. त्यावेळी बांदल यांना अटक करण्यात आली होती. तसेच ईडीने बांदल यांच्या निवासस्थानातून कागदपत्रे जप्त केली आहेत. याबरोबरच त्यांच्या बॅंक खात्यांची माहितीही ईडीच्या अधिका-यांनी घेतली आहे.

तसेच मंगलदास बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलीसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. याबरोबरच बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बॅंक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गेल्या काही दिवसांपासून ते ईडीच्या रडारवर आहेत. आता ईडीने त्यांची मालमत्ता जप्त केली आहे.

Share This Article