तडीपार गुंड शहरात आला; पोलिसांनी सापळा रचून……..

bpcauthor bpcauthor
1 Min Read

खेड, दि. ३० (पीसीबी) : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट तीनने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 29) सायंकाळी सहा वाजता खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे करण्यात आली.

विनोद संभाजी भिसे (वय 28, रा. केळगाव, ता. खेड) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर जैनक यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद भिसे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 18 ऑक्टोबर 2023 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याने बेकायदेशीरपणे कोयता हे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला शस्त्रासह अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article