मनी लॉड्रींगच्या नावाखाली पावणे सात लाखांची फसवणूक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

चिंचवड,दि. २१ ऑगस्ट (पीसीबी )

मनी लॉड्रींगच्या नावाखाली एका नागरिकाची सहा लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 24 जुलै ते 2 ऑगस्ट 2024 या कालावधीत रस्टन कॉलनी, चिंचवड येथे घडली.

याबाबत 48 वर्षीय नागरिकाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फेडेक्स कुरिअर व मनी लॉड्रींग संबंधित पैसे भरण्यास सांगितले. स्काईप अ‍ॅपद्वारे फिर्यादी यांना व्हिडिओ कॉल करीत सहा लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article