हातचलाखी करीत महिलेची फसवणूक

0
41
187143521

दि. ३१ जुलै (पीसीबी) भोसरी,
धान्य फुकट मिळत आहे. त्यामुळे तुमचे दागिने काढून ठेवा, असे सांगत एका महिलेचे दागिने हातचलाखी करीत चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 30) दुपारी एक वाजताच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथे घडली.

सत्यभामा प्रदिप आढाव (वय 58, रा. ज्ञानेश्वर होसींग सोसायटी, दिधी रोड, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास फिर्यादी या आळंदी रोड, भोसरी येथून पायी चालल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ दोन चोरटे आले. त्यांनी फिर्यादी सत्यभामा यांना फुकट धान्य मिळते असे सांगून फिर्यादी महिलेला विश्वासात घेऊन त्यांच्या अंगावरील सोन्याची पोत व कानातील सोन्याचे कर्ण फुले काढण्यास सांगून ते फिर्यादीचे जवळील पाकीटात ठेवण्यास सांगून त्यांनी हातचालखी करुन सत्मभामा यांची 7 ग्रॅम वजनाची 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत व 1 ग्रॅम वजनाची दोन हजार रुपये किंमतीची कर्ण फुले असा एकूण 8 ग्रॅम वजनाचे 22,000/-रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.