शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 47 लाखांची फसवणूक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

हिंजवडी,दि.18 जुलै (पीसीबी) – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 47 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जानेवारी ते 17 जुलै 2024 या कालावधीत पुनावळे येथे घडली.याप्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसाराक्शय वर्मा, दरीका, वीरेंद्र मनसुखानी, अदिती सिंग आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल असे आमिष दाखवले. त्यातून फिर्यादीकडून 47 लाख 95 हजार 363 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article