रस्त्याच्या बाजुला पार्क केलेली कार चोरीला

bpcauthor bpcauthor
1 Min Read

निगडी, दि. 11 (पीसीबी) – रस्त्याच्या बाजूला पार्क केली कार रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 28 जून रोजी सकाळी अंकुश चौक, निगडी येथे उघडकीस आली.

युवराज रंगनाथ जाधव (वय 32, रा. अंकुश चौक, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे टूरीस्ट कार चालवतात. त्यांनी त्यांची दोन लाख रुपये किमतीची कार (एमएच 12/क्यूजी 1176) 26 जून रोजी घराजवळ रस्त्याच्या बाजूला पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी कार चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article