मारहाण करून भंगार व्‍यावसायिकाला भोसरीत लुटले

bpcauthor bpcauthor
1 Min Read
crime

दि ४ जुलै (पीसीबी ) – चार चोरट्यांनी दगडाने मारहाण करून भंगार व्‍यावसायिकाला लुटले. ही घटना खंडे वस्‍ती, भोसरी येथे बुधवारी (दि. 3) पहाटे अडीच वाजताच्‍या सुमारास घडली.

विनोद राजबहादूर विश्‍वकर्मा (वय 37, रा. लकी स्‍कॅप सेंटर, खंडेवस्‍ती, भोसरी) असे मारहाणीत जखमी झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे. त्‍यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी विश्‍वकर्मा यांचे खंडेवस्‍ती, भोसरी येथे लकी स्‍कॅप सेंटर नावाचे भंगाराचे दुकान आले. बुधवारी पहाटे अडीच वाजताच्‍या सुमारास चार चारटे आले. त्‍यांनी दुकानाचा दरवाजा वाजविला. फिर्यादी यांनी दरवाजा उघडला असता चार चोरटे दुकानात शिरले. त्‍यांनी पैशाबाबत विचारणा केली. मात्र फिर्यादी यांनी सांगण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे फिर्यादी यांना ढकलून आत आले. फिर्यादी यांनी दुकानाच्‍या बाहेर पळ काढला. आरोपी यांनी पाठलाग करीत फिर्यादी विश्‍वकर्मा यांना पकडून दगडाने मारहाण करीत जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्‍या खिशातून 22 हजारांची रोकड चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article