गुगल रेटिंगच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक

PCB Admin
1 Min Read

दि ४ जुलै (पीसीबी ) – गुगलवर रेस्टोरंटला रेटिंग देऊन पैसे कमावण्याबाबत विश्वास संपादन करून एका व्यक्तीची सात लाख 40 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत सांगवी परिसरात ऑनलाईन माध्यमातून घडला.

याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस सोशल मिडियावरून संपर्क केला. फिर्यादीस गुगलवर रेस्टोरंटला रेटिंग देण्याचे काम असून एका रेटिंगसाठी 25 रुपये मिळतील असे आमिष दाखवले. फिर्यादींनी ते काम सुरु केले. सुरुवातीला आरोपींनी फिर्यादीस आठ हजार 695 रुपये दिले. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन करुंत यांना प्रीपेड टास्क देऊन त्यांच्याकडून सात लाख 40 हजार 405 रुपये घेतले. त्यानंतर त्यांना परतावा अथवा त्यांची गुंतवणुकीची रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article