मसाज करुन घेणाऱ्या PSI ला पाच हजार रुपयांचा दंड

0
115

पुणे पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एका तरुणाकडून पायाची मसाज करुन घेत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली होती. आता त्या पीएसआयची पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली असून त्याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या माहितीला वाहतुक पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दुजोरा दिला.

कल्याणीनगर पोर्शे अपघातानंतर वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अचानक नाकाबंदी करण्यात येत आहे. कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करत होते. त्यावेळी एका मोटारीतून सणसवाडीचे तरुण निघाले होते.पोलिसांनी कागदपत्रे नसल्याने मोटारचालकाला दंड केला. त्यानंतर नाकाबंदीतील कर्मचारी तरुणाला घेऊन काही अंतरावर खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्याकडे घेऊन गेला. पोलीस अधिकाऱ्याने (पीएसआयने) तरुणाची कानउघाडणी केली आणि त्याला पाय चेपायला सांगितले.

कारवाईच्या भीतीमुळे त्याने पाय चेपून दिला. याची चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या पीएसआची बदली करण्यात आली.

तरुणावर कारवाई करताना तो सोडून देण्यासाठी विनंती करत होता. त्यातुन त्याने पीएसआयचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला. तो व्हीडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्याची सत्यता पडण्यात आली आहे. त्यात पीएसआयने पायाची मसाज करण्यास सांगितल्याचे दिसत नाही. तो तरुण पाय धरत होता, असे दिसते. तरुणावर तत्काळ कारवाई करणे अपेक्षित होते. त्यामुळे पीएसआयची बदली केली आहे.

  • रोहिदास पवार, वाहतुक पोलीस उपायुक्त.