पुणे, दि. १९ (पीसीबी) – पुणे शहरात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालवत दोघांना घडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथे घडला. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे. हा भीषण अपघात करणाऱ्या अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलेले आहे. अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दुचाकीवर असलेली मुलगी हवेत उडली. त्यानंतर जमिनीवर आदळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम कंपनीच्या मालकाच्या अल्पवयीन मुलाने अत्यंत बेदरकारपणे आलिशान गाडी चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. यामध्ये दोघांना चिरडले. अपघातातील अनिस अवलिया याचा उपचार सुरू असताना तर अश्विनी कोस्ता हिचा जागीच झाला. हे दोघेही राजस्थानमधील होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी आणि अनिस हे दोघेही त्यांच्या मोटारसायकल वरून कल्याणीनगरकडून येरवड्याकडे मित्रांसह जात होते. त्यावेळी पोर्से या आलिशान कार याच रस्त्याने भरधाव वेगात निघाली होती. कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या गाडीने मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली. यामध्येच दोघांचा मृत्यू झाला.