अज्ञात वाहनाने धडकेत पोलीस हवालदार सचिन नरोटे यांचा मृत्यू

bpcauthor bpcauthor
1 Min Read

चिंचवडमध्ये पोलीस हवालदार सचिन नरोटे यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई- बंगळुरू महामार्गावर घडली. अज्ञात वाहनचालक फरार असून त्याचा शोध पिंपरी- चिंचवड पोलीस घेत आहेत. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन नरोटे हे देहू रोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कर्तृत्वार असलेले नरोटे रात्री साडेदहाच्या सुमारास पुनावळे येथून देहूरोड पोलीस ठाण्याच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. त्यांना अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ज्या वाहनाने धडक दिली ते न थांबता निघून गेले. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This Article