पिस्टल व जिवंत काडतुसासह एकाला अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दिघी, दि. १३ (पीसीबी) :- पिस्टल व जिवंत काडतुसासह एका 23 वर्षीय तरुणाला दिघी येथून अटक कऱण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.12) दिघी येथील मॅग्जीन चौक येथे दुपारी दरोडा विरोधी पथकाने केली आहे.

ब्रम्हदेव माधव लटपटे (वय 23 रा.आळंदी) असे अटक आरोपीचे नाव आहे, याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई विनोद वीर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही परवानगी शिवाय आरोपी हा बेकायदेशीर रित्या लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण 41 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी आरोपीवर भारतीय शस्त्र हत्यार बंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.,

Share This Article