बेकायदेशीर रित्या गॅस छोट्या सिलेंडर मध्ये भरल्या प्रकरणी एकाला अटक

bpcauthor
1 Min Read

भोसरी, दि. १३ (पीसीबी) :- कोणत्याही परवानगी शिवाय मोठ्या सिलेंडर मधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याप्रकऱणी एका तरुणाला अटक केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.12) भोसरी येथील धावडे वस्ती येथे गुन्हे शाखा युनिट 1 यांनी केली आहे,

निर्गन कैलास राठोड (वय 30 रा. भोसरी) याला अटक केली आहे,याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई विशाल भोईर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणत्याही परवानगी शिवाय मानवजातीस धोका असताना देखील, बेकायदेशीरपणे कोणत्या ही सुरक्षितते शिवाय मोठ्या गॅस सिलेंडर मधून छोट्या गॅस सिलेंडर मध्ये गॅस भरत होता. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Share This Article