दिल्लीचा दगा महाराष्ट्राला नवा नाही… खासदार अमोल कोल्हे यांचा व्हिडीओ व्हायरल

bpcauthor bpcauthor
1 Min Read

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. बंडखोरी करून शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालेला अजित पवार गटच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असं निवडणूक आयोगाने मंगळवारी (६ फेब्रुवारी) म्हटलं आहे. या निर्णयानंतर शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल कोल्हे यांनी शेअर केलेला व्हिडीओ हा प्रयोगातील आहे, ज्यात अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. ‘दिल्लीचा दगा महाराष्ट्राला नवा नाही. कालही… आजही…!!!’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. “इथल्या पाण्याच्या थेंबाथेंबात आणि मातीच्या कणाकणात मिसळलेल्या सळसळत्या रक्ताचा हा अंगार या मनामनात धगधगता ठेवाल. कटकारस्थानं होतंच राहतील, या ना त्या मार्गाने विष प्रयोग होतच राहतील. या साऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या मनातला संभाजीरुपी अंगार ज्वालामुखी बनून उफाळून येईल आणि सळसळेल मराठमोळ्या धमन्यांमध्ये,” असं ते या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

Share This Article