टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

bpcauthor bpcauthor
1 Min Read

चाकण, दि. २३ (पीसीबी) – भरधाव वेगात आलेल्या एका टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 22) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास नानेकरवाडी चाकण येथे घडली.

किरण गिरेश्वर गवळे (वय 21, रा. चाकण. मूळ रा. नांदेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पुरुषोत्तम गुलाब पवार (वय 31, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दादासाहेब लक्ष्मण क्षीरसागर (रा. फत्ते वडगाव, ता. आष्टी, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण गवळे हा सोमवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दुचाकीवरून कामावर जात होता. नाणेकरवाडी येथे आल्यानंतर भरधाव वेगात आलेल्या एका टेम्पोने त्याच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. यामध्ये किरण हा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article