कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

खेड, दि. २३ (पीसीबी) – कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 21) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मंगरूळ गावच्या हद्दीत तांबोळी पडळ वस्ती येथे करण्यात आली.

खंडू मारुती शिर्के (वय 32, रा. कोळवे, ता. खेड), नाथा किसन शिंदे (वय 48, रा. सुतारवाडी, गडद, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी योगेश बबन शेटे (वय 33, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका टेम्पोमध्ये दोन बैलांची कत्तलीसाठी वाहतूक केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत आरोपींच्या ताब्यातून बैलांची सुटका केली. तसेच दोन लाख रुपये किमतीचा एक टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article