दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

मारुंजी, दि. २३ (पीसीबी) – दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. 21) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास कोलते पाटील सोसायटी समोर मारुंजी येथे घडला.

प्रदीप अनिल दाभाडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. संदीप संतोष गराडे (वय 24, रा. चांदखेड, ता. मावळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एमएच 14/बीएच 5265) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप आणि त्यांचा मित्र प्रदीप हे दोघे रविवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. कोलते पाटील सोसायटी समोर आल्यानंतर समोरच्या दिशेने भरधाव वेगात एक दुचाकी आली. समोरील दुचाकीस्वाराने त्याच्या ताब्यातील दुचाकी हयगईने चालवून संदीप यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये संदीप यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर त्यांचा मित्र प्रदीप याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article