भरधाव डंपरने वृद्ध महिलेस चिरडले

bpcauthor bpcauthor
1 Min Read

चिखली, दि. २३ (पीसीबी) – भरधाव जाणाऱ्या डंपर ने वृद्ध महिलेला चिरडले. हा अपघात सोमवारी (दि. 22) सकाळी दहा वाजताच्या सुमारास कुदळवाडी चिखली येथे घडला.

याप्रकरणी दीपक बाळू गवारे (वय 23, रा. मोईगाव, ता. खेड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर चालक सुखशांत व्यंकटराव कांबळे (वय 34, रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे याने त्याच्या ताब्यातील डंपर (एमएच 14/केक्यू 7284) भरधाव, निष्काळजीपणे चालवला. त्याने फिर्यादी यांच्या आजीला (वय 78) धडक देऊन तिच्या अंगावरून डंपर चालवला. यामध्ये डंपर खाली चिरडून फिर्यादी यांच्या आजीचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपी डंपर चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article