पीएमपी बस प्रवासात सव्वा लाखाची सोन्याची बांगडी चोरीला

bpcauthor bpcauthor
1 Min Read

वाकड, दि. २२ (पीसीबी) -पीएमटी बस प्रवासादरम्यान महिला प्रवाशाची एक लाख 20 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरीला गेली. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास डांगे चौक, वाकड येथे उघडकीस आली.

याप्रकरणी महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी सकाळी देहू-आळंदी येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या देहू-आळंदी येथे दर्शन घेऊन निगडी मार्गे डांगे चौक येथे आल्या. त्यावेळी त्यांच्या हातातील एक लाख 20 हजार रुपये किमतीची पाटली चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article