पत्नी आणि मेहुणीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

bpcauthor bpcauthor
1 Min Read

देहूरोड, दि. २२ (पीसीबी) – पत्नी आणि मेहुणीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास देहूरोड येथे घडली.

नारायण मधुकर निर्वळ (वय 35) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी नारायण यांचे भाऊ ज्ञानेश्वर मधुकर निर्मळ (वय 39, रा. सोमठाना, ता. मानवत, जि. परभणी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नारायण यांची पत्नी आणि मेहुणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण यांना त्यांची पत्नी आणि मेहुणी या दोघींनी मिळून मानसिक त्रास दिला. नारायण यांच्याकडे दोघी महिलांनी दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. तसेच नारायण यांच्या पत्नीच्या अनैतिक संबंधांना मेहुणीने प्रोत्साहन देऊन नारायण यांच्याशी वाद घातला. या त्रासाला कंटाळून नारायण यांनी आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article