घरात घुसून दमदाटी व मारहाण केल्या प्रकरणी मेहुण्यासह चार जणांवर गुन्हा दाखल

bpcauthor bpcauthor
1 Min Read

वाकड, दि. १९ (पीसीबी): घरात घुसून दमदाटी व मारहाण केल्या प्रकरणी पत्नीच्या भावा सह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा सारा प्रकार बुधवारी (दि.17) वाकड येथे घडला आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अतुल सुधाकर बंड (वय 33 रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मयुर मोतीराम इंगळे (रा. पारस, बाळापूर) व त्याचे तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी या घारी आल्या असता फिर्यादी यांनी त्यांना आत घेत घराचा दरवाजा लावला. यावेळी मयूर याने त्याच्या साथीदारांसह जबरदस्तीने घरात प्रवेश करत फिर्यादी यांना दमदाटी व शिवीगाळ केली. तसेच मारहाण करत भघून घेण्याची धमकी दिली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article