वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या

bpcauthor bpcauthor
1 Min Read

रहाटणी, दि. १६ (पीसीबी) -वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 11 मार्च 2023 रोजी नखातेनगर, रहाटणी येथे घडली.

प्रदीप अशोक देवताळे (वय 38) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अवधूत शिंगारे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्लुरी, अमन, किरण कापुरे, अनिकेत देशमुख (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप देवताळे हे फ्रेश टू होम या कंपनीमध्ये नोकरी करत होते. कंपनीतील वरिष्ठ असलेल्या आरोपींनी फिर्यादीस टार्गेट करून त्यांचा मानसिक छळ केला. तसेच त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून प्रदीप यांनी 11 मार्च 2023 रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article