पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – कपडे नेण्यासाठी घरी आलेल्या पत्नीला पती आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केली. या प्रकरणी पतीसह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 14) दुपारी विठ्ठल नगर पिंपरी गाव येथे घडली.

राहुल निळकंठ रामपुरे (वय 27, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) आणि इतर सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल याच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांची आई आणि भाऊ यांना घेऊन स्वतःचे कपडे आणण्यासाठी पतीच्या घरी आल्या. त्यावेळी पतीने ‘तू आमच्या घरात का आली’ असे म्हणून त्यांना पोटात लाथ मारली. तसेच हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. फिर्यादी यांच्या आई आणि भावाला देखील आरोपींनी मारहाण करत जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article