भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

PCB Admin
1 Min Read

चाकण, दि. १६ (पीसीबी) -भरधाव कारने दुभाजकाला धडक देऊन विरुद्ध दिशेने जात एका दुचाकीला धडक दिली. ही घटना रविवारी (दि. 14) रात्री नऊ वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथे घडली.

गणेश राजाराम शिंदे (वय 35, रा. चासकमान, ता. खेड) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विष्णू नामदेव कुऱ्हाडे (वय 27, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश शिंदे हे तळेगाव चौक चाकण येथून आंबेठाण चौकाकडे पुणे नाशिक महामार्गावरून जात होते. वाघवस्ती येथे आल्यानंतर विरुद्ध दिशेने आलेल्या एका कारने रस्त्यातील दुभाजकाला धडक दिली. त्यानंतर कार विरुद्ध दिशेला आली आणि कारची गणेश शिंदे यांच्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये गणेश शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article