टास्कच्या बहाण्याने 41 लाखांची फसवणूक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

हिंजवडी, दि. १२ (पीसीबी)- टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने एका महिलेची 41 लाख 33 हजार 200 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 15 डिसेंबर 2023 ते 11 जानेवारी 2024 या कालावधीत सुसगाव येथे घडली.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीस संपर्क करून त्यांना टास्कच्या बहाण्याने टेलिग्रामवर लिंक पाठवली. ती लिंक ओपन करण्यास सांगून त्यांना वेगवेगळे टास्क देत त्यांच्याकडून 41 लाख 33 हजार 200 रुपये घेत त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article