भाजप माजी नगरसेविकेच्या पतीने गुजराथी बिल्डरला केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण

0
169


पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – महापालिकेत भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीने एका बिल्डरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही कैद झालाय. महापालिकेत राडा घालणारे नितीन बोऱ्हाडे हे भाजप आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती आहेत. त्यांनी बिल्डर नरेश पटेला यांना सर्वांदेखत लाथा बुकक्यांनी मारहाण केली.

नितीन बोऱ्हाडे यांचे चुलते आणि नरेश पटेलांची बोऱ्हाडेवाडीत जमीन आहे. सर्व्हे नंबर ६४४ मध्ये दोघांची जमीन एकमेकांना लागून आहे. त्याच जमिनीतून डीपी मार्ग जातो, त्यावरून दोघांमध्ये वाद सुरुयेत. त्याची सुनावणी आज महापालिकेत होती. त्या सुनावणीनंतर नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेलांमध्ये वाद झाले. यातून नितीन बोऱ्हाडे यांनी आधी पटेलांच्या कानशिलात आणि नंतर लाथ ही मारली. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी बोऱ्हाडे यांना रोखले आणि प्रकरण तिथंच निवळले. पण हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

‘तुम्ही न्यायालयात जा अथवा कुठं ही जा, मला फरक पडत नाही’, असं नरेश पटेल माझ्या चुलत्याला बोलले. हे अशोभनीय होतं, त्याच रागात हे घडलं, असं मारहाणीनंतर नितीन बोऱ्हाडे यांनी स्पष्टीकरण दिले. मी असे काहीच बोललो नाही, उलट डीपीनुसार मार्ग होऊ द्या. त्यानुसार झाल्यास मलाच फायदा होणार होता. त्यामुळं बोऱ्हाडे यांनीच न्यायालयात जाण्याची भाषा वापरल्याचा दावा नरेश पटेलांनी केला.
आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक असल्याने नितीन लांडगे यांनी हे धाडस केले, अशी चर्चा आहे.
नितीन बोऱ्हाडे यांनी सर्वांदेखत नरेश पाटलांना अशी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याने शहरातील गुजराथी समाजात तीव्र नाराजीचा सूर आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे असल्याने लांडगे यांची दादागिरी आहे. त्यांचाच गैरफायदा घेतला जातो आहे, असे व्यापारी म्हणाले.