केंद्रीय तपास यंत्रणा व पुणे शहर पोलिसांची बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोठी कारवाई

0
218

पुणे, दि. १४ (पीसीबी) – ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक, भारतात बेकायदेशीर प्रवेश करून विनापरवाना वास्तव्य, तसेच बनावट कागदपत्र सादर करून भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड प्राप्त केले म्हणून एकूण ११ बांगलादेशी नागरिकांवर हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

१५ ऑगस्ट २०२१ रोजी सेंट्रल एजेन्सी द्वारे माहिती प्राप्त झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी ७ बांगलादेशी नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सर्व संशियतानी आपण बांगलादेशी असल्याचे मान्यही केले. तसा स्टेशन डायरी रिपोर्ट ही नोंद झाला.

तरीही संशयित विदेशी नागरिकांकडे ते बांगलादेशी असल्याचा पुरावा नाही असे अजब कारण देऊन हडपसर पोलिसांनी बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या सर्व सात बांगलादेशी घुसखोरांना चक्क सोडून दिले होते.
मात्र Military Intelligence तपास करून यापैकी काही बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात सबळ पुरावे जमवले. त्याआधारे ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक झालेली आहे व त्यांच्या पुण्यात विनापरवाना राहणाऱ्या कुटुंबियांवरही गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी ३ संशयितांना ऑगस्ट २०२१ दरम्यान पुणे पोलिसांनी चौकशी करून सोडले होते.

बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात आणुन त्यांना भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड इत्यादी मिळवून देण्याचे मोठे रॅकेट उघड झाले आहे. काही अटक आरोपी भारतात कमावलेले पैसे संशयित मार्गाने पद्धतशीरपणे बांगलादेशात पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे.