गरवारे टेक्निकल फायबर कंपनीच्यावतीने सिंहगड किल्ल्यावर वृक्षरोपण

0
203

पुणे, दि. २४ जुलै (पीसीबी ) – पिंपरी- चिंचवड,पुणे येथील, गरवारे टेक्निकल फायबर कंपनी व कामगार संघटनेच्याच्या वतीने रविवार दिनांक 23 रोजी ” दरवर्षी प्रमाणे सिंहगडावर वृक्षारोपण करण्यात आले. गेली अनेक वर्षे गरवारे टेक्निकल फायबर कंपनी व गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपच्या” वतीने वेगवेगळ्या ठिकाणी व गड किल्ल्यावर वृक्षारोपण व वृक्ष सवंर्धन असे उपक्रम राबवण्यात येत असतात.

दिघी येथील दत्तगड,देहूरोड येथील घोरडेश्वर,भंडारा डोंगर, दुर्गा टेकडी व जवळपासच्या अनेक ठिकाणी व्यवस्थापन,कामगार संघटना व गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने दरवर्षी नियमितपणे वृक्षारोपण करण्यात येते. विविध उपक्रमाद्वारे प्रदूषण व पर्यावरण समतोल राखण्यासाठी कंपनीकडून खारीचा वाटा उचलण्यात येत असतो. सिंहगडावर आज राबवण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेत चिंचवड व वाई प्लांट मधील कामगार कर्मचारी व कुटुंबीय अशा दीडशे जणांनी सहभाग घेतला.

या वेळी आॅक्सिजनची निर्मीती करणाऱ्या,करंज,पिंपळ,चिंच कडुलिंब,सिल्व्हर ओक,बकुळी अशा विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, यासोबत गडाच्या पायथ्याशी व गडावर प्लास्टिक कचरा एकत्र करून स्वच्छताही करण्यात आली. या यावेळी कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री प्रबोध कामत व श्री विवेक कुलकर्णी यांनी “प्रत्येकांनी एक तरी झाड लावून त्याचे व्यवस्थित संवर्धन व संगोपन केले पाहिजे” असे सांगितले.

गडावरील रिमझिमणारा पाऊस, दाट धुके व निसर्गसौन्दर्याचा आनंद घेत, गरवारे कुटुंबीयांनी एकूण 85 झाडांचे वृक्षारोपण केले.. यावेळी भारतमाता कि जय,व छत्रपती शिवाजी महाराज कि जय या घोषणांनी गडावरील अवघे वातावरण भारावून गेले.
कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी श्री प्रबोध कामत,श्री विवेक कुलकर्णी श्री राजेंद्र शिवराईकर श्री रावेंद्र मिश्रा श्री प्रशांत बोडके श्री विलास आरेकर,श्री गणेश भोसले,श्री डी व्ही कुलकर्णी, श्री राहुल बारावकर श्री निशांत जाधव,अमर खंडागळे ,अमर चव्हाण तसेच कामगार संघटनेचे जनरल सेक्रटरी संजय शिंदे,खजिनदार श्री संजय गायकवाड,सल्लागार श्री नितीन झेंडे,प्रवीण डावरे व निसर्गप्रेमी ग्रुपचे शाम कुंभार,नारायण माने सुभाष कडू मनोज साळवी,राजेंद्र दुनगव,शशांक चव्हाण व इतर कामगार, कर्मचारी व कुटुंबीय या सगळ्यांनी मोठ्या संख्येनी या उपक्रमात सहभाग घेतला.