महाराष्ट्र आम आदमी पार्टी संघटनेच्या उपाध्यक्षपदी विजय कुंभार, विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

0
287

पुणे, दि. १० (पीसीबी) – महाराष्ट्रात आम आदमी पार्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पार्टीत विविध पदाधिकाऱ्यांची काल नियुक्ती करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी नेते गोपाल इटालिया यांनी सदर समितीची घोषणा करताना सांगितले की यापुढे महाराष्ट्रातील नवनियुक्त पदाधिकारी महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेपर्यंत आम आदमी पार्टीची ध्येय धोरणे तसेच दिल्ली आणि पंजाब मधील जनहिताची केलेल्या कामांची माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवितील, तसेच राज्याच्या प्रत्येक गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात लोकांच्या समश्या सोडविण्याचे आटोकाट प्रयत्न करतील, भ्रष्टाचाराविरोधात पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करतील असे ही ईटालिया यांनी सांगितले.

राज्य संघटनेच्या नियुक्तीत स्टेट कॅम्पेन ईन्चार्ज रंगा राचुरे, उपाध्यक्ष विजय कुंभार, उपाध्यक्ष धनंजय शिंदे, संघटन सचिव संदीप देसाई, अजित फाटके, नविंदर सिंग अहलुवालिया, भूषण धाकुळकर, मनिष मोडक, हनुमंत चाटे, अजित खोत, रियाज पठाण, महिला आघाडी अध्यक्षा सीमा गुट्टे, युवा आघाडी अध्यक्ष मयूर दौंडकर, राज्य मीडिया प्रमुख चंदन पवार, समिती सदस्य देवेंद्र वानखेडे आणि संजय कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आप पार्टीला आणखी मजबूत बनवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यापासून तर तालुका पर्यंत आणखी मोठ्या प्रमाणात नियुक्त्या दिल्या जातील असे गोपाल इटालिया यांनी सांगितले आहे.