पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

हिंजवडी , दि. १६ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 14) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हिंजवडी जवळ माणगाव येथे करण्यात आली.

ऋषिकेश सुभाष ओझरकर (वय 25, रा. ओझरकरवाडी, माण, ता. मुळशी), रोशन दशरथ तेलंगे (वय 21, रा. ओझरकरवाडी, ता. मुळशी. मूळ रा. यवतमाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अरुण नरळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणगाव येथील बस स्टॉप जवळ दोघेजण संशयितरित्या थांबले असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 70 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे दोन लोखंडी पिस्टल आढळून आले. पोलिसांनी पिस्टल जप्त करत दोघांना अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article