“५० खोके एकदम ओक्के” हे वक्तव्य तात्काळ सोशल मीडियातून काढा-दिल्ली हायकोर्टाचा आदेश

bpcauthor bpcauthor
1 Min Read

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – राज्याच्या राजकारणातील आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला दिल्ली हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या आमदारांविरोधात केलेले “५० खोके एकदम ओक्के” हे वक्तव्य तात्काळ सोशल मीडियातून काढून टाका, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.

तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे नेते राहुल रमेश शेवाळे यांनी दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या दाव्यात दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना समन्स बजावले आहे. या खटल्यात न्यायालयाने संजय राऊत यांनाही समन्स बजावले आहे.

Share This Article