पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची निवड

bpcauthor
1 Min Read

पुणे दि .१०- पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील (दैनिक देशदूत -सार्वमत) यांची एकमताने निवड करण्यात आली.

सोमवारी (दि.१० ऑगस्ट) विश्वस्तांची अध्यक्ष पदाच्या निवडीची सभा मावळते अध्यक्ष शैलेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत राजेंद्र पाटील यांची पदाधिका-यांची एकमताने निवड केली.

कार्यवाहपदी पांडुरंग सांडभोर (पुढारी) आणि खजिनदारपदी सुनीत भावे (महाराष्ट्र टाइम्स) तर प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी विठ्ठल जाधव (सामना), शैलेश काळे (आज का आनंद ) आणि अंजली खमितकर (प्रभात) आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके (सकाळ) यांची पद्धसिद्ध विश्वस्तपदी या पूर्वीच निवड झाली आहे.

Share This Article