काळेवाडी, चिखलीतून तीन लाखांचा गुटखा जप्त

bpcauthor bpcauthor
1 Min Read

काळेवाडी, दि. २८ (पीसीबी) – चिखली येथे गुन्हे शाखा युनिट दोनने कारवाई करून दोन लाख 23 हजारांचा तर काळेवाडी येथे वाकड पोलिसांनी कारवाई करत 89 हजारांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी चिखली आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

महेंद्र हिरालाल पवार (वय 24, रा. चिखली) याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह देवा राम देवासी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई उद्धव खेडकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी महेंद्र पवार याने त्याच्या किराणा दुकानामध्ये विक्रीसाठी गुटखा साठवून ठेवला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून दोन लाख 23 हजार 821 रुपयांचा गुटखा आणि तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांची चाहूल लागतात देवा राम देवासी हा पळून गेला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

दुसरी कारवाई वाकड पोलिसांनी केली असून प्रदीप मांगीलाल गुप्ता (वय 44, रा. काळेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद कदम यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी प्रदीप याने 89 हजार 333 रुपये किमतीचा गुटखा विक्री करण्याच्या हेतूने स्वतःजवळ बाळगला. याबाबत त्याला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article