महाळुंगे मधून तीन किलो गांजा जप्त

1 Min Read

तळेगाव दाभाडे, दि. २८ (पीसीबी) – तळेगाव-चाकण रोड, महाळुंगे येथून अंमली पदार्थ विरोधी पथकाने तीन किलो गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. २७) दुपारी करण्यात आली.

कमलेश ज्ञानेश्वर भोसले (वय ३३, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड), नितीन भोपळे (वय ३२, रा. गेवराई, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कमलेश याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक गारगोटे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळे गाव-चाकण रोडवर महाळुंगे इंगळे येथे एका टपरीमध्ये गांजा विक्री सुरु असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत ७५ हजार १५० रुपये किमतीचा तीन किलो सहा ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article