दिघीत महिलेवर बलात्कार

1 Min Read

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – महिलेला इमोशनल ब्लॅकमेल करून महिलेवर वारंवार बलात्कार केला. हा प्रकार मार्च २०२२ ते १६ सप्टेंबर २०२२ या कालावधीत खडी मशीन रोड, दिघी येथे घडली.

आकाश अनिल मिसाळ (वय २२, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची दररोज होणाऱ्या भेटीतून ओळख झाली. त्यानंतर आरोपीने महिलेला इमोशनल ब्लॅकमेल करून तिचा वारंवार पाठलाग केला. महिलेची मैत्री करून त्यांना खडी मशीन रोडवरील एका लॉजवर नेले आणि जबरदस्तीने त्यांच्यावर वारंवार बलात्कार केले. हा प्रकार कुणाला सांगितला तर फिर्यादी महिला आणि तिच्या घरच्यांना जगू देणार नाही, असे म्हणत हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article